Published On : Sat, Mar 19th, 2022
By Nagpur Today Nagpur News

इको फ्रेंडली वातावरणात होळी पर्व उत्साहाने साजरा

Advertisement

-होळी चा रंग उधळला मात्र जरा जपूनच

कामठी :-मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या सावटामुळे सन समारंभ सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर निर्बंध होते .गर्दी टाळण्यासाठी चार पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव असल्याने होळी सारख्या रंगाचा उत्सवही निरुत्साहीपणे साजरा करण्यात आला होता.यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी होती.शिथिल झालेल्या कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्षांची मरगळ झटकून नागरिकानी होळी व धुळीवंदन पर्व मोठ्या उत्साहाने साजरा केला .

होळीचा दुसरा दिवस हा पाडव्याचा असून होळीच्या या पाडव्याला सकाळपासूनच गुलाल व रंगाची मोठ्या प्रमाणात उधळण होताना दिसली तर बालक मंडळी रंगाच्या रंगात चांगलेच रंगून होते तरतळीरामासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाचा व धुमाकूळ चा असल्याने कित्येकच कोंबड्या बकऱ्याची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली तर काहींना या उत्सवाचा आनंद पनीर ची भाजी खाऊनच समाधान मानावे लागले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळी या पर्वानिमित्त 17 मार्च ला तालुक्यात विविध संघटनेच्या वतीने वाईटाचा नायनाट करणे या भूमिकेतून सार्वजनिक तसेच खाजगी होळी जाळून होलिकादहन कार्यक्रम साजरा करण्यात आला तर होलिका दहन झाल्यानन्तर वाईटाचा नायनाट केल्याच्या आनंदात 18 मार्च ला धुलीवंदनाचा दिवस हा आनंदाचा मौजमस्तीचा असून बुरा ना मानो होली है या म्हणीनुसार एकमेकांना रंग लावीत गुलालाची उधळण करीत धुळीवनदानाचा दिवस हा इकोफ्रेंडली व खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने पार पडला. तसेच नागरिकांनी होळी चा रंग उधळला मात्र तो जरा जपूनच….

Advertisement

होळीचा सन म्हटला की तो आनंदाचा सन असतो सर्वच जण या सणाच्या प्रतीक्षेत असतात तर काही ठिकाणी धुळवडीच्या दिवशी मारामाऱ्या, भांडणे होत असल्याने या सनाला गालबोट लागीत असतात तर होळीच्या दुसरा दिवस धुळीवदन चा दिवस हा पोलिसांच्या खऱ्या परीक्षेचा दिवस असतो त्यामुळे स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी सह अतिरिक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा ठिकठिकानी पोलीस बंदोबस्त लावून विशेष लक्ष केंद्रित करीत खबरदारी घेतली गेली तसेच वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने खबरदारी घेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते परिणामी हा पर्व मोठ्या उत्साहाने पार पडले

या रंगोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डीसीपी मनिष कलवानिया व महिला एसीपी यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे व जुनी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राहुल शिरे यांच्या नेतृत्वात संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

बॉक्स:-काल 18 मार्च हिंदू समाजबांधवांचा धुळीवंदनाचा पर्व तसेच मुस्लिम समाजबांधवांचा शब ए बारात पर्व एकाच दिवशी आल्याने हे दोन्ही पर्व यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करून ठेवले होते.

संदीप कांबळे

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.