Published On : Tue, Aug 11th, 2020

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा – जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

Advertisement

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शन सूचना जारी

नागपूर : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचनाबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्याअनुषंगाने नागपूर जिल्हयात (शहरी भाग वगळता) या वर्षाचा गणेशोत्सव व इतर सण शक्यतो सार्वजनिक स्वरूपात साजरे न करता वैयक्तिक किंवा घरगुती स्वरूपात साध्या पध्दतीने साजरे करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हयात (शहरी भाग वगळता) नागरिकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ऐवजी घरच्या घरी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर जिल्हयात (शहरी भाग वगळता) सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावयाचे झाल्यास खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना करण्यात येत आहे. त्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

· सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

Advertisement

· कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

· श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरीता 4 फुट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादेत असावे.

·यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातु, संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडूची पर्यावरणपुरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य
नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मुर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास, या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटुंबीयांचे कोरोना साथीचे रोगापासून रक्षण होईल.

· उत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी
आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच हा सण आरोग्य उत्सव म्हणून साजरा करावा, सामाजिक संदेश
असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

· सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम शिबीरे उदा. रक्तदान, प्लाझमा दान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेन्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

· आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी
तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

· श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन
देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

·गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सीग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

· श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ
नागरीकांना सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेश मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

· महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

· श्री गणेशाची मुर्ती तयार करणा-या व विक्री करणा-या व्यवसायिकांनी सुध्दा मुर्ती तयार करताना व विक्री
करतांना कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगार, व्यावसायिकांनी मास्क, सॅनेटायझरचा
वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.

· श्री गणेशाची मुर्तीची विक्री करणा-या व्यवसायिकांना शक्यतोवर ऑनलाईन बुकिंग घेऊन घरपोच मुर्ती
पोहचविण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून दुकानात गर्दी होणार नाही.

· कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखायला शासनातर्फे दिलेल्या सूचना व निर्देशाचे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges