नागपूर : देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले असून त्यात नागपूर शहराने पहिला क्रमांक मिळविला आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर येथील १,७३० एकर परिसरात ३,५८८.९७ कोटींचा प्रकल्प उभारला जाणार आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
त्यातील ४५३ कोटी प्राप्त झाले आहेत. एरिया बेस्ड डेव्हलपमेंट घटकांतर्गत कामे सुरू असून त्यावर ११० कोटी खर्च केले आहेत. एक-एक कामाद्वारे उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
डिसेंबरपर्यंत डीपीआर पूर्ण होईल. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मार्च २०१८ पासून प्रत्यक्षात कामांना प्रारंभ होणार आहे.
लवकरच सुरू होणारे प्रकल्प
५२ किलोमीटरचे रस्ते, इंटिग्रेटेड रोड, पाणीपुरवठा, सिवरेज, नाले, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, स्मार्ट बस शेल्टर, शेअर बाईक, ई-रिक्षा
आदी प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचे शहराचे चित्र बदलणार आहे.
नागपूर शहरात 3667 कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ सुरक्षेसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य झाले आहे़ उद्यान, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, व्यावसायिक संकुल आदी कामांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
युरोपियन
युनियनमध्ये करार नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियनमध्ये इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार झाला आहे.