नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वी आणि १० विचा निकाल जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई बोर्डाचे इयत्ता १० वीतील ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर बारावीचे 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यशस्वी साबू 10 वी बोर्डाच्या परीक्षेत अव्वल तर अंकुश शांडिया 12वीतून सायन्स टॉपर ठरला आहे. दोन्ही विद्यार्थी नागपूरच्या भवन्स विद्या मंदिरचे आहेत.
या दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय त्यांचे शिक्षक आणि पालकांना दिले आहे. एकाच दिवशी सीबीएसई (CBSE) बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाला आहे .
सीबीएसई (CBSE) बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. दरम्यान सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकणे आवश्यक आहे.