Published On : Mon, May 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, 93.6% विद्यार्थी उत्तीर्ण

Advertisement

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. आज दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा परीक्षेत एकूण 93.6 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

विद्यार्थी https://cbseresults.nic.in वर भेट देऊन बोर्डाचा निकाल पाहू शकतात.यावर्षी सीबीएसई बोर्डातर्फे फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या.

यंदा १० वी बोर्डाच्या परीक्षेला ३९ लाख विद्यार्थी बसले होते.

गतवर्षीच्या तुलनेत 0.48 टक्के अधिक निकाल लागला आहे. सीबीएसई बोर्ड 10वीमध्येही त्रिवेंद्रम अव्वल राहिले. येथील उत्तीर्णतेची टक्केवारी 99.75% इतकी आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.