Published On : Thu, May 31st, 2018

CBSE Class 10 Result : सेंट झेविअर्स हाय स्कुलचा १००% निकाल

Advertisement

St. Xavier’s MIDC Excels in AISSE 2018

नागपूर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. सेंट झेविअर्स हाय स्कुल एम.आय.डी.सी. हिंगणा या शाळेचा निकाल दर वर्षीप्रमाणे यंदाही १००% लागला. २६८ विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत.

शाळेतून प्रथम गुणानुक्रम असलेल्या प्रेरणा अग्रवाल या विद्यार्थिनीला ५०० पैकी ४९२ गुण (९८.२) मिळाले आहेत. तिला संस्कृत, गणित आणि समाज शास्त्रात १००% गुण मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पूजन गांधी आहे ज्याला ४८० (९६%) गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दोन विद्यार्थी आहेत – प्रखर गुप्ता आणि आर्यमान महाजन, ज्यांना ४७९(९५.८%) गुण आहेत. ८४ विद्यार्थी प्राविण्यासह (७५+%) उत्तीर्ण झाले.

शाळेचे संस्थापक चेअरमन डॉ. ए.एफ. पिंटो आणि प्रबंध संचालिका मॅडम ग्रेस पिंटो यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट निकालाबद्दल अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापिका शशिबाला धोटेकर, पर्यवेक्षिका शोभना टेम्भूर्णे , प्रशासक निशित विजयन आणि सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे, आणि भविष्यातील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या आहेत.