चाइल्ड पॉर्नोग्राफी संदर्भात नागपूरच्या कामठीसह देशभरात 59 ठिकाणी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. या कारवाईला ऑपरेशन मेघ चक्र असे नाव देण्यात आले होते. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे दोन व्हिडिओ डाऊनलोड करून ते सर्क्युलेट करण्याच्या प्रकरणात दाखल दोन गुन्ह्य़ांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई 21 राज्यात एकाच वेळेस करण्यात आली. इंटरपोल सिंगापूरच्या वतीने काही गोपनीय माहिती सीबीआयला मिळाली होती. न्यूझीलंड पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात ठोस अशी माहिती सीबीआयला दिली होती. या आधारावरच सीबीआयने आजचे ऑपरेशन मेघचक्र राबवले.भारतीय नागरिकांनी चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओज डाऊनलोड करून ते पसरवल्याचं सीबीआईच्या तपासात उघड झाले आहे.
या कारवाईदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे ज्यात मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. सध्या 50 संशयित आरोपी या प्रकरणात सीबीआयने शोधले असून, त्यांच्या कडून ताब्यात घेतलेल्या उपकरणांची सायबर फॉरेन्सिक टूलच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे.