नागपूर: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे जनरल मॅनेजर अरविंद काळे यांना महाराष्ट्रातील नागपूर येथे 20 लाख रुपयांच्या कथित लाच प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
काळे हे या प्रकल्पाचे व्यवस्थापकही असल्याचे रविवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर एका खासगी कंपनीकडून लाच घेतल्याचा आरोप आहे.
सीबीआयने काळेच्या अटकेनंतर केलेल्या चौकशी दरम्यान 20 लाखांच्या लाचेसह 45 लाख रुपये जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे आणि अन्य 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तापस सुरू आहे.