Published On : Mon, Sep 2nd, 2019

सावधान ! कामठित डेंग्यू चा धोका घोंगावतोय

-कामठी तालुक्यात पसरली डेंग्यूची दहशत,प्रभाग क्र 14 येथे एक पाठोपाठ डेंग्यूग्रस्त आजाराची लागण, भीमनगर मध्ये एका 13 वर्षीय मुलीला डेंग्यूग्रस्त आजाराची लागण

कामठी : कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 14 येथील रहिवासी मानसिंग(पहेलवान )यादव वय 51 वर्षे रा यादवनगर कामठी चा डेंग्यूग्रस्त ।आजाराने तडकाफडकी मृत्यू झाल्याच्या घटनेला एक आठवडा लोटत नाही तोच प्रभाग क्र 14 च्या भीमनगर येथील एका 13 वर्षीय शालेय विद्यार्थिनीला डेंग्यू रोगाची लागण झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात डेंग्यू रोगाची दहशत पसरली आहे.तेव्हा सावधान!कामठी तालुक्यात डेंग्यू चा धोका घोंगावत असुन तालुक्यात डेंग्यू रोगाची दहशत पसरली आहे.

मागील आठवड्यात डेंग्यू ग्रस्त आजाराने एका धष्टपुष्ट इसमाचा तडकाफडकी मृत्यू झाल्याने नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य विभागाची तडकाफडकी सभा घेत आरोग्य विभागाला डेंगू रोगाबाबत जनजगृती करीत नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केले यानुसार आरोग्य विभागाचे पथक प्रभाग क्र 14 सह शहरात घरोघरी भेट देत डेंग्यू रोगाची लागण व त्यावरील उपाय व घ्यावयाची काळजी याबाबत जनजगृती करीत आहेत कामठी तालुक्यात डेंग्यू आजाराने चांगलेच डोके वर काढले असून या आजाराची चांगलीच दहशत पसरली असून परिसरात खळबळ माजली आहे.

– संदीप कांबळे, कामठी