Published On : Tue, Jun 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या सिविल लाईन्समध्ये कारला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Advertisement

नागपूर -शहरातील सिविल लाईन्स भागात मंगळवारी एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना सीपी क्लबसमोर घडली असून, आगीमुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

साक्षीदारांच्या माहितीनुसार, कारमध्ये अचानक धूर येऊ लागल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिविल लाईन्स अग्निशमन विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शर्तीचे प्रयत्न करत काही वेळातच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन विभागाकडून आगीचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, नागपूरसारख्या मध्यवर्ती शहरात वाहनांना लागणाऱ्या अशा अचानक आगीच्या घटनांमुळे नागरिकांनी वाहनांची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.