Published On : Sat, Apr 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

एसी कोचमधून गांजा तस्करीचा पर्दाफाश; नागपूर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

Advertisement

नागपूर : रेल्वेच्या एसी कोचमधून प्रीमियम तत्काळ तिकिटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या गांजा तस्करीचा नागपूर रेल्वे पोलिसांनी मोठा भंडाफोड केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या या कारवाईत सुमारे १० किलो गांजा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसच्या एसी थ्री टियर कोच बी-६ मध्ये तपासणी दरम्यान वरच्या बर्थ क्रमांक ३ आणि ६ वर प्रवास करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

Gold Rate
Apr 30- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,49,400 /-
Gold 22 KT ₹ 1,38,900 /-
Silver/Kg ₹ 2,38,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख शंतनू प्रधान आणि बुल्ला रामू शेट्टी अशी असून दोघेही ओडिशा राज्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे १० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत २ लाख ६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक तपासात आरोपी प्रीमियम तत्काळ तिकीट घेऊन एसी कोचमध्ये प्रवास करत होते, जेणेकरून त्यांच्यावर कोणाचाही संशय येऊ नये. या पद्धतीने ते गांजाची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे.

ही संपूर्ण कारवाई नागपूर रेल्वेचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे ही तस्करी वेळेत उधळून लावण्यात यश आले.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement