नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा घोळ निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले होते व नागपुरातील ४७ पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती. मात्र बदलीच्या वेळी पोलीस ठाण्यात कार्यरत नसलेल्या पोलीस निरीक्षकांची बदली अभिप्रेत नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. हे पाहता पोलीस महासंचालक कार्यालयाकडून शहरातील २९ पोलीस निरीक्षकांची बदली रद्द करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आदेशानंतर हे २९ पोलीस निरीक्षक पुन्हा नागपुरात आपल्या सेवेत रुजू होणार आहेत.
३० जून २०२४ पर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या निरीक्षकांचा ३१ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या यादीत समावेश होता.लोकसभा निवडणुका मुक्त व स्वच्छ वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशांनुसार या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र या बदल्यांच्या विरोधात राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात तक्रार केली.
या प्रकरणी चैकशीचे आदेश दिल्यानंतर नागपुरातील २९ पोलीस निरीक्षक हे २१ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस ठाण्यात कार्यरत नसल्याने त्यांची बदली अभिप्रेत नसल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यातील एकूण ६५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नागपुरात परतणाऱ्या पोलीस निरीक्षकाची नावे भानुप्रताप मडावी, अशोक कोळी, मनीष बन्सोड, मनोहर कोटनाके, वैजयंती मांडवधरे, विश्वनाथ चव्हाण, विनोद चौधरी, राजेश पुकाळे, मुकुंद साळुंके, अरविंद भोळे, हरिदास मडावी, बापू ढेरे, जग्वेंद्रसिंह राजपूत, दीपक गोसावी, हनमंत उर्लगोंडावार, नंदा मंगाते, अनिरुद्ध पुरी, अमित डोळस, संजय जाधव, संग्राम शेवाळे, अमोल देशमुख, राजेंद्रकुमार सानप, शुभांगी देशमुख, कविता इसारकर, बबन येडगे, रवींद्र पवार, रवींद्र नाईकवाड,रवी नागोसे, भारत कऱ्हाडे अशी आहेत. तर मनीष ठाकरे, राहुल आठवले, आसाराम चोरमाळे, शैलेश गायकवाड, दीपाली धडगे, प्रसाद गोकुळे, राजश्री आडे, अशोक भंडारे, सुनील पिंजन, विश्वजित खुळे, बाळकृष्ण सावंत, अरविंद पवार, राजू चव्हाण, सचिन गावडे, ज्ञानेश्वर आव्हाड, गीताराम शेवाळे, विकास धस, अरुण गरड हे पोलीस निरीक्षण परत जाणार आहेत.