नागपूर : ७०-३० चा फॉर्मुला सरकारने रद्द करावा आणि समान कायदा…समान नेमणूक आणि गुणवत्तेवर सिलेक्शन झाले पाहिजे अशी मागणी करतानाच सरकारने याची लवकर दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय भांबळे यांनी दिला.
मराठवाडयातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या सर्व आमदारांनी ७०-३० च्या फॉर्मुल्याविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. इंजिनिअरींग, मेडिकल कॉलेजच्या विदयार्थ्यांना असा रेषो लावला आहे की, मराठवाडा सोडून ज्या काही जागा असतील त्या उर्वरीत भागासाठी विदयार्थ्यांना मिळतील. आता राहिलेल्या ३० टक्के जागा मराठवाडयासाठी मिळणार आहेत असा अन्यायकारक निर्णय भाजप सरकारने घेतला आहे असा आरोप आमदार विजय भांबळे यांनी केला.
दरम्यान जे हुशार विदयार्थी आहेत ते त्यांच्या कर्तुत्वाने पुढे येतील अशा विदयार्थ्यांना राखीव जागा असल्या पाहिजेत अशी मागणीही आमदार विजय भांबळे यांनी केली.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





