Published On : Thu, Feb 28th, 2019

म.न.पा.बाजार विभागा तर्फे मंगळवारी झोन येथे थकीत परवाने धारकांवर जप्ती कारवाई मोहिम

नागपूर महानगरपालिकेव्दारे आज दिनांक २८ फेब्रुवारी, २०१९ रोजी बाजार विभागर मंगळवारी झोन क्रं.१० येथे सक्तीने थकीत परवाने धारक यांचे दुकानाची जप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे.

मंगळवारी कॉम्पलेक्स मधील अप्पर ग्रा.फलोर बजाज वींग मधील श्री.किशोर रमेश बहेरीया दुकान १५९ थकीत परवाना शुल्क सन २०१० ते २०१९ पर्यंत रु.२,३५,२९१/- मंगळवारी मिनी शॉप मधील श्री.ब्रीजमोहन मोर दुकान क्रंमांक १५ पहिला माळा थकीत परवाना शुल्क सन २०१० ते २०१९ पर्यंत रु. ७८,८०३/- असूण सदर डिस्पेनसरी मधील श्री.

ठाकूर सुखरामदास जग्याशी तळ मजला उत्तर भाग दुकान क्रमांक १० यांचे थकीत परवाना शुल्क सन २०१० ते २०१९ पर्यंत रु. १,४२,३२९/- थकीत परवाना शुल्क असल्याने बाजार विभाग मंगळवारी झोन क्रमांक १० व्दारे तीन दुकानांना सिल करण्यात आले आहे.

मंगळवारी झोन अंतर्गत जप्तीची कार्यवाही श्री.मिलींद मेश्राम बाजार निरीक्षक, प्रदीप वागदे बाजार निरीक्षक, बाजार मोहरील श्री.संजय बडे, निलेश वाघुळकर, कपील ठाकरे, कीशोर शेन्डे, हवालदार धाडगे, तूरकर यांचे उपस्थित दुकान सिल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.