Published On : Fri, Apr 5th, 2019

नविनतम विषयांचा अभ्यास करून उद्यमशील तेकडे तरुणांनी वळावे – गडकरी

Advertisement

नागपुर: या देशाचे भविष्य तरुणाईच्या हातात आहे. संशोधन आणि सतत नविनतम विषयांचा अभ्यास करून उद्यमशील तेकडे तरुणांनी वळावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी यांनी आज मनसोक्त संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की न तरुणांशी संवाद साधण्यास मला नेहमीच आवडत आले आहे मी सतत अनेक देशांचा दौरा केला विविध तज्ञांशी माझी चर्चाही होते प्रत्येक ठिकाणी असे लक्षात आले की नवीनतम टेक्नॉलॉजी आणि संशोधन करण्यात भारतीय तरुण कुठेही मागे नाही विदेशामध्ये भारतीयांच्या बुद्धिमत्तेला मोठी किंमत आहे परंतु इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये एखाद्या विषयाचे पेटंट मिळवण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे हे आपले दुर्भाग्य आहे परंतु या तरुणांच्या कल्पकतेला आणि संशोधनाला वाव देण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञा नाची सांगड घालून या देशात अत्यंत सुलभ अशा संशोधनाद्वारे आपण सुपर पावर होऊ शकतो खरेतर भारत सुपर पॉवर होण्यासाठी ही योग्य वेळ आहे इंनोवेशन ए्नटरप्रेन्युरशीप आणि स्किल डेव्हलपमेंट यासाठी प्रत्येक क्षेत्रात प्राधान्याने काम करण्याची गरज आहे “कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ” हेच आपले ब्रीद असावे असेही नितीन गडकरी म्हणाले.

तरुणांनी आऊट ऑफ बॉक्स विचार करायला लागावे असे मला वाटते नागपूर हे आता जगाच्या नकाशात आकर्षणाचे केंद्र बनणार आहे येत्या काही दिवसात नागपूर हे एव्हिएशन हब देखील पुढल्या पाच वर्षात पन्नास हजार तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प मी केला आहे असे सांगून नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

नितीन गडकरी भला माणूस : दत्ता मेघे
सतत नवीन घडविण्याचा विचार करणारे आणि गोरगरीब दीनदलित यांचे कल्याण करण्याचा ध्यास घेणारा नितीन गडकरी हा भला माणूस आहे. जात-पात धर्म आणि भाषा या पलीकडे विचार करून केवळ विकासाचा धर्म पाळणारा हा माणूस ऊस निश्चितच देशाचा कल्याणकारी नेता आहे, त्याच्या पाठीशी तरुणाईने उभं राहावं असे आवाहन माजी खासदार आणि मेघे ग्रुप चे अध्यक्ष दत्ता मेघे यांनी यावेळी केले.

रायसोनी महाविद्यालयाच्या सभागृहातील कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी सुनील रायसोनी यांच्यासह आमदार समीर मेघे, सागर मेघे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय वाघे, शिवानी दाणी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.