Published On : Fri, Aug 2nd, 2019

कन्हान महामार्गावर बस स्टाप व सुलभ सौचालय त्वरित बनवावे – संदीप शेंडे

Advertisement

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले कन्हान शहर असुन सुध्दा शहरात व्यवस्थित बस स्टाप व सुलभ शौचालय नसल्याने नियमित ये-जा करण्या-या प्रवाशांना आणि नागरिकांना उन, वारा, पाऊस व शौचालया करिता भयंकर त्रास सहन करावा लागत असल्याने कन्हान शहरात महामार्गावर बस स्टाप व सुलभ शौचालय त्वरित बनविण्याची मागणी बसपा कन्हान शहर अध्यक्ष संदीप सेंडे हयानी शासनास केली आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणा -या महामार्गावर वसलेले कन्हान शहर हे परिसरातील ४० गावाचे केंद्र स्थान असुन राष्ट्रीय महामार्गावर नगरपरिषद समोर व तारसा रोड चौकात बस थांबा आहे. येथे प्रवासी वाहने थांबत असल्या ने परिसरातील महिला , पुरुष, विद्यार्थी व नागरिकांना बाहेर गावी जाण्याकरिता प्रवासी वाहनाच्या प्रतिक्षेत थांबावे लागते. या दोन्ही शहर व ग्रामीण बस थांब्यावर व्यवस्थित बस स्थानक (बस स्टाप) नसल्याने भर उन्हात व भर पाऊसात उभे राहताना उन, वारा , पावसाचा त्रास सहन करावा लागतो तसेच कन्हान रेल्वे फाटक, पोलीस स्टेशन पासुन तर कांद्री पर्यंत महामार्ग शौचालय नसल्याने प्रवाशांना व नागरिकांना कुठे कसे तरी उघडयावर शौच्छास बसावे लागत असते यामुळे होणा-या त्रासामुळे कन्हान शहरा चे नाव खराब होत असुन सुध्दा येथील शासन, प्रशासन आणि राजकीय मंडळी निद्रा अवस्थेत असल्याचे दिसुन येत आहे.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम अंत्यत मंद गतीने सुरू असुन पावसाळ यात या अपुऱ्या सिमेंट रस्ता कामामुळे अपघाताचे प्रमाणात सुध्दा वाढ होत आहे. यास्तव लवकरात लवकर महामार्ग सिमेंट रस्त्याचे काम पुर्ण करून कन्हान शहरातील महामार्गावर मुख्य चौकात शौचालय, व्यवस्थित दोन म्हणजे ५० प्रवासी थांबता यावे असे दोन शहर व ग्रामीण बस स्थानक व सुलभ शौचालय त्वरित बनविण्याची मागणी बहुजन समाज पार्टी कन्हान शहर अध्यक्ष संदीप शेंडे हयानी केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.