Published On : Sat, Jul 4th, 2015

बुलढाणा : क्रुझरमध्ये शस्त्रांसह जाणाऱ्या युवकांना पकडले

Advertisement


Buldhana Crime News - Awjar
बुलढाणा।
धामगांव बढे येथुन जवळच असलेल्या पिंपळगाव देवी फाट्या जवळ एक क्रुझर गाडीतुन कोयते, फायटर आदी धारदार शस्त्रासह जात असतांना बुलडाण्याच्या पाच युवकांना धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली असल्याची घटना गुरुवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडली.

रात्री 12 वाजेच्या सुमारास पिंपळगावदेवी, धामणगाव बढे पोलिसांनी एक गाडी पेट्रोलिंग करत असतांना त्यांना क्रुझर क्र.एम.एच.28 व्ही. 3950 मध्ये दहा ते अकारा युवक प्रवास करतांना आढळुन आले. संशय आल्याने पोलिसांनी सदर गाडीची तपासणी केली असता गाडीतुन दोन कोयते व पाच नग फायटर मिळुन आले आहेत. प्रकरणी कैलास प्रल्हाद पिंपळे (24) जगदंबा नगर बुलडाणा, प्रविण हर्षवर्धन गवई (23) रा. विजय नगर बुलडाणा, राहुल गौतम खरे (23) विजय नगर बुलडाणा, विशाल दिलीप जाधव (22) शांतीनगर बुलडाणा या पाच जनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा आरोप पाचही जनांवर ठेवण्या आला असुन त्यांच्यावर अवैधपणे शस्त्रे बाळगण्याचा गुन्हा नोंदवुन त्यांना अटक करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी वाटमारी किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने ही टोळी फित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेचा पुढील तपास सेवानंद वानखेडे करत आहेत.

Gold Rate
08 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 1,08,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement