Published On : Sun, Jul 5th, 2015

बुलढाणा : दुकानातुन साड्या चोरणाऱ्या दोन महिला सिसिटीव्हीत कैद


theft
बुलढाणा।
भरदिवसा हात चालाखीने दोन महिलांना एका साड्याच्या दुकानातुन साड्या लंपास केल्याची घटना आज 11 वाजेच्या सुमारास घडली. दुकानात बसविलेल्या सिसिटीव्ही कैमेऱ्यामध्ये ही चोरी बंदीस्त झाली असुन सिसिटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.

स्थानिक एकता नगर मधील समता नगर चौकात सिमा साडी या कपड्याच्या दुकानात दोन अज्ञात महिलांनी साडी खरेदी करण्यासाठी प्रवेश केला. भरपूर साड्या दाखवा, असे म्हणत त्यांनी दुकानाच्या मालक सौ.सिमा टेकाळे यांच्या कडून साड्या पाहण्यास सुरुवात केली. साड्यांची डब्बेच्या डब्बे त्या त्या दोघींकडून उघडण्यात आल्या. साड्या पाहुन झाल्या नंतर आम्हाला साड्या पसंत नाही असे म्हणुन त्या दोन महिला दुकानातुन निघुन गेल्या. अस्ताव्यवस्त पडलेल्या साड्या पुन्हा डब्यात ठेवण्यासाठी जमा करीत असतांना सिमा टेकाळे यांना 13 साड्यांचे डब्बे रिकामे आढळुन आले, या साड्यांची किंमत 1 हजार रुपये ही बाब लक्षात येताच सिमा टेकाळे त्यांना जाणीव झाली की आपण लुबाडल्या गेलो आहे, याची जाणीव होताच त्यांनी हा घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर याबाबत शहर पोलिस स्टेशनला माहिती दिली. यावरुन पोलिसांनी अज्ञात महिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.