Published On : Mon, Jul 6th, 2015

बुलढाणा : सहकार विद्यामंदिर धाड येथे गुणवंतांचा सत्कार

sahakar photo
बुलढाणा। बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय धाड येथे इयत्ता 10 वी 12 वी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाºया गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन पारितोषक देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

माजी जि.प.सदस्य तथा बुलडाणा अर्बनचे स्थानिक संचालक देविदास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला दिपक  भालवे व बुलडाणा अर्बनचे विभागीय अधिकारी शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहकार विद्यामंदिरचे इयत्ता 10 वी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी ऐश्वर्या देवकर, सचिन इंगळे, लता बारवाल तसेच 12 वी मध्ये जयश्री खंदाडे, दिक्षा इंगळे, रुपाली राजपुत यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर डोंगर खंडाळा येथील स्वाती इतापे ही एमपीएससी परिक्षेत ओबीसी संवर्गातुन महाराष्ट्रातुन सर्वप्रथम येवुन पी.एस.आय. झाल्याबद्दल हिचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य वासुदेव बोरे यांनी पी.एस.आय. स्वाती इतापे हिने प्रतिकुल परिस्थितीत कसे यश मिळविले हे सांगितले. तर गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबविण्यात येतात याची माहिती दिली. या सत्कार कार्यक्रमात ऐश्वर्या देवकर हिने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पी.एस.आय. स्वाती इतापे हिने एम.पी.एस.सी परिक्षेची तयारी कशी करावी, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर धाड विभागातुनही एमपीएससी परिक्षेसाठी विद्यार्थी जास्तीत जास्त बसावे यासाठी धाड येथे मार्गदर्शन केंद्र उघडावे यासाठी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. सुत्रसंचालन इम्रान शेख यांनी तर आभार मुख्याध्यापक अभिजीत देशमुख यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.