| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jul 18th, 2015
  Vidarbha Today | By Nagpur Today Vidarbha Today

  बुलढाणा : मलकापूरात राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा


  बुलढाणा।
  सोप्या खेळातून मुलांना सांघिक भावना जपत कामाच्या नियोजनाचा भाग शिकविणाऱ्या लगोरी सारख्या जुन्या खेळाची 17 ते 19 जुलै अशी तीन दिवशीय राज्यस्तरीय अंजिक्यपद स्पर्धा सध्या जिल्ह्यातील मलकापूर नगरीत आयोजित करण्यात आली आहे़. राज्यभरातील 25 जिल्ह्याचे मुला मुलींचे 450 खेळाडू सहभागी होणार आहेत़. कृषी उत्पन्न बाजार समिती बेलाड येथील क्रीडांगणावर दिवस व रात्र अशा वेळेत कृत्रिम प्रकाश झोतात. हे सामने खेळवण्यात येणार आहेत़बुलडाणा लगोरी स्पोर्ट असोसिएशन आणि व्हि़एऩस्पोर्ट अँकडमी मलकापूर यांच्यावतीने जिल्ह्यात पहिल्यांदा राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा खेळवण्यात येत आहे़. शुक्रवारी सकाळपासून संघ दाखल होण्याला सुरूवात झाली़. खऱ्या अर्थाने 18 जुलैच्या सकाळच्या सत्रापासून ह्या स्पर्धेला रंगत येणार आहे़. 50 पंच, अधिकारी, तांत्रिक समितीचे पदाधिकारी सुध्दा मलकापूरात डेरेदाखल झाले असल्याची माहिती श्रीराम निळे यांनी दिली आहे़.

  Lagori

  File pic

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145