Published On : Mon, Jul 27th, 2015

बुलढाणा : महावितरण कडुन घेण्यात आला ग्राहक मेळावा

Advertisement

27bld03photo
देऊळगावराजा (बुलढाणा)। ग्राहकाला अव्वाच्या सव्वा बिल देयक देण्यात आले. त्यासाठी महावितरण कंपनी कडुन ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात 18 हजाराच्यावर ग्राहकांची संख्या आहे. तर ग्राहक मेळाव्याची सुचना कोणत्याही विज ग्राहकांना मिळाली नसुन तक्रार करणाºयांची संख्या एकदम कमी दिसुन आली. विज कंपनी कडून अव्वाचे सव्वा बिले आकरण्याचा प्रकार सद्या शहरात समोर आला आहे. विज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचे नमुने नविन नाहीत चुक महावितरणची असुनही त्यात सुधारणा करण्या ऐवजी ग्राहकाला मनस्ताप सोसण्याची वेळ आली आहे.

स्थानिक नगर पालिका भवनमध्ये 25 जुलै रोजी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेषत: महावितरण कंपनी कडून घेण्यात येणाऱ्या ग्राहक मेळाव्याची ग्राहकांना माहिती देण्यात आली नाही. म्हणुन 18 हजार ग्राहकांना जास्त विज बिलाचा भुर्दंड बसतो. महावितरण कंपनीच्या गलथाण कारभारामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहक मेळाव्याच्या सुचना न देता परस्पर मेळावा घेवुन शहरातील मर्जीतील व्यापारी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आर्थीक लाभ करुन त्याच सहभाग ग्राहक मेळाव्यात दिसुन आला. मात्र शहरातील हजारो गोर गरिब ग्राहक विज बिल संदर्भात व विद्युत पुरवठा संदर्भात वारंवार संबधीत अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवितात मात्र, या ग्राहकांना जाणिव पुर्वक वरिष्टांकडून घेण्यात आलेल्या मेळाव्यापासुन कोसोदुर ठेवण्यात आले.

विज ग्राहकांना दरमहा वेळेच्या आत अचुक विद्युत बिल देण्याची जबाबदारी देऊळगावराजा विज वितरण कंपनी कार्यालयातील उपविभागीय अभियंता नांदुरकर यांची असतांना सुध्दा ते याबाबीकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या मेळाव्यात ग्राहकांनी केला. यावेळी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता झुजलवार, सोनपोसाळे, उपकार्यकारी अभियंता नांदुरकर व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी उपस्थित होते.