Published On : Fri, Mar 6th, 2020

शेतकरी, जनसामान्यांचे हित जोपसणारा अर्थसंकल्प – राजेंद्र मुळक

Advertisement

Rajendra Mulak

नागपूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प संकटात सापडलेल्या शेतकºयांचे आयुष्य उजळविणारा आणि जनसामान्यांचे हित जोपसणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थराज्यमंत्री आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केली.

राज्य अर्थसंकल्पात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच २ लाखावर कर्ज असलेल्या शेतकºयांचे २ लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासोबत कर्जाची नियमित परफेड शेतकºयांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पिक विमा योजनेकरिता सरकारने २०२६ कोटींची तरतूद केली आहे. यासोबत कापूस उत्पादक शेतकºयांना सरकार मदत करणार आहे. या शेतकरी केंद्रीत अर्थसंकल्पामुळे राज्यात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

यासोबतच महाविकास आघाडी सरकारने आमदार निधीची रक्कम २ कोटी वरून ३ कोटींची करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

राज्यात ८० टक्के स्थानिक युवकांना संबंधित प्रकल्पात व योजनेत रोजगार देण्याचा कायदा अंमलात आणला जाणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंद्राक शुल्कात १ % सवलत देण्यात येणार असल्याने घर घरेदी करताना सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासोबतच सामाजिक न्याय विभागासाठी ९७०० कोटींची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प राज्याला नवी दिशा देणारा ठरेल असे मुळक यांनी स्पष्ट केले.