नवी दिल्ली: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे.
हा अर्थसंकल्प विकासदर वाढवणं, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणं या सरकारच्या हेतूंनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असल्याचे विधान सीतारमण यांनी केले.
सरकार पंतप्रधान धनधान्य योजना राज्य सरकारांसोबत राबवेल. त्यात शेती उत्पादकता वाढवणे, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, माल साठवणूक पर्याय, सिंचन सुविधा आणि क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं असेल. यातून १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. यात १०० जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल.
देशात ५. ७ कोटी लघुउद्योग असून त्यातून ७.५ कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सीतारमण म्हणाल्या.