केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशाला डिजीटलायजेशनकडे देणाऱ्या अनेक तरतुदी आहेत . पहिल्यांदाच अर्थमंत्र्यांनी कागदपत्र किंवा वहिखाता नाही तर टॅब घेऊन बजेट सादर केलं . डिजिटल क्रांतीची ही सुरुवात आहे .
देशाला डिजीटलायजेशनकडे नेणारी पहिलीच डिजीटल जनगणना होणार आहे , यासाठी ३८०० कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलीय , शिवाय डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी १५०० कोटींची तरतूद आहे. या व्यतीरीक्त डिजीटलायजेशनाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक तरतुदी आजच्या या अर्थसंकल्पात आहेत असं म्हणत सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी आजच्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय.
अजित पारसे, सोशल मिडीय तज्ज्ञ
www.ajeetparse.com
Advertisement

Advertisement
Advertisement