Published On : Mon, Jan 24th, 2022
By Nagpur Today Nagpur News

बसपा चे जनसंपर्क अभियान दक्षीण नागपूर बसपा

Advertisement

महापौर बनाओ अभियान अंतर्गत दक्षिण नागपुर बसपाने आज दि. 22 जानेवारी ला काढलेल्या जनसंपर्क अभियानात महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, महाराष्ट्र प्रदेश मा सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी महिला विंग वर्षाताई वाघमारे, नागपुर जिल्हा सचिव नितिन वंजारी, नागपूर शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे, दक्षीण नागपुर विधान सभेचे उपाध्यक्ष प्रीतम खडतकर, कोषाध्यक्ष सचिन कुंभारे, सचिव सुमित जांभूळकर, माजी नगरसेवक अजय डांगे, कमलताई पाटील, संभाजी लोखंडे, हेमंत बोरकर, धनराज हाडके, संजय शिंदे, गुड्डू कांबळे, प्रभाकर जवादे, अरुण शेवडे, शामराव तिरपुडे, सुरेश ढेंगरे, राष्ट्रपाल पाटील, आकाश कावळे, भास्कर गणवीर, सुनील मसराम आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

16 जानेवारी पासून महापौर बनाओ अभियान अंतर्गत सुरू झालेल्या जनसंपर्कद्वारे आतापर्यंत चंद्रमनी नगर, कुंजीलाल पेठ, नालंदा नगर, इंदिरा कॉलोनी, चंद्रनगर, बालाजी नगर, नाईक नगर, रिपब्लिकन वसाहत, मेडिकल कॉलोनी, वसंत नगर, प्रगती नगर न्यू कैलास नगर, श्रमजीवी नगर शाहू कॉलोनी आदी वसाहतीतील नागरिक व मतदारांशी जनसंपर्क करण्यात आला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी बसपा कार्यकर्त्यांनी “बाबा का हाथी आया है बीएसपी ने लाया है”, “बाबा आपका मिशन अधुरा बीएसपी करेगी पुरा”, “जयभीम का नारा गुंजेगा भारत के कोने-कोने मे”, “बीएसपी की क्या पहचान नीला झेंडा हाथी निशाण”, जो बहुजन की बात करेंगा वह दिल्ली से राज करेंगा”, “एससी एसटी ओबीसी भारत के है मूल निवासी”, “ओबीसी भाई जागेगा चोर लुटेरा भागेगा, “ओबीसी भाई जाग जाओ देश मे अपना शासन लाओ” “ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे”, “महापुरुषोके सम्मान मे बीएसपी मैदान मे” “संविधान के सम्मान मे बीएसपी मैदान मे”, “व्होट हमारा राज तुम्हारा नही चलेगा नही चलेगा”, “व्होट की रक्षा कैसी हो बहू बेटी जैसी हो” आदी घोषणा देत-देत बसपा कार्यकर्ते वसाहतीत फिरले.

जनसंपर्क अभियानाच्या सातव्या दिवशी आज दक्षिण नागपुरातील बसपाचे जनसंपर्क कार्यालय न्यू कैलाश नगर येथून सुरुवात करण्यात आली, न्यू कैलाश नगर, श्रमजीवी नगर, शाहू कॉलनी मधील प्रत्येक रांगेत घरोघरी जाऊन बसपा नेते व कार्यकर्त्यांनी मतदार व नागरिकांशी जनसंपर्क केला. यावेळी बसपाला नागरिकांचे भरपूर समर्थन असल्याचे दिसून आले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.