मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.नुकतेच देशमुख हत्या प्रकरणातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर आता संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टन अहवाल समोर आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
पोस्टमार्टन अहवाल काय झाला खुलासा-
या अहवालामध्ये देशमुख यांच्या हनुवटी, कपाळ आणि दोन्ही गालांवर जखमांच्या खुणा होत्या तसेच त्यांच्या पोटावर बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा खुलासा या अहवालामध्ये करण्यात आला आहे. याच बरोबर त्यांच्या नाकामधून रक्त आलेलं आहे. त्यांच्या छाती आणि गळ्यावर जखमांच्या खुणा होत्या. त्यांच्या दोन्ही बरगडीवर मारहाण करण्यात आली आहे.
देशमुखांच्या डाव्या खांद्यावर तीव्र जखमा, दंड, कोपर, मनगट, हाताच्या मुठींवर जखमा होत्या. मारहाणीमुळे जखमा काळ्या निळ्या झाले होते. संपूर्ण पाठ काळीनिळी झाली होती, त्यांच्या शरीरातील रक्त साखळले होते. इतक्या निर्दयीपणे संतोष देशमुखांना मारहाण झाली असे या अहवालामध्ये म्हटले आहे.
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews





