Published On : Mon, Sep 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रम्हाशंकर त्रिपाठी तर सरचिटणीस म्हणून बोरकर यांची निवड !

Advertisement

नागपूर : नागपूर श्रमिक पत्रकार संघाची (२०२३-२५) ची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. ब्रह्माशंकर त्रिपाठी (लोकमत टाइम्स) अध्यक्षपदी, शिरीष बोरकर (द हितवाडा) सरचिटणीसपदी निवडून आले आहे.

परितोष प्रामाणिक (हितवाद) आणि अनंत मुळ्ये (तरुण भारत) उपाध्यक्ष; मोरेश्वर मानापुरे (लोकमत) कोषाध्यक्ष; पराग जोशी (तरुण भारत) संघटन सचिव; अनुपम सोनी (द हितवाद) आणि अभिषेक तिवारी (नव भारत) याची संयुक्त सचिव म्हणून निवड झाली आहे. हितेश लिंबाचिया (द हितवाद), सुनील सोनी (लोकमत समाचार), निखिल दीक्षित (द हितवाद), किरण राजदेरकर (तरुण भारत), हेमंत सालोटकर (तरुण भारत), आनंद मोहरील (तरुण भारत), हुमेरा मरियम (द हितवाद) राजश्री यादव (लोकमत समाचार)हे कार्यकारिणी सदस्य आहेत.

रविवारी प्रेस क्लब येथे झालेल्या (NUWJ) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी निवृत्त पत्रकार बसंतकुमार तिवारी, महेश उपदेव, मीरा टोळे, वर्षा तुपकर-मदने आणि वर्षा बाशू यांचा नागपूर विभागाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार विश्वास इंदूरकर मुख्य निवडणूक अधिकारी तर वर्षा बाशू सहायक निवडणूक अधिकारी होत्या. प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्रा, जिल्हा माहिती अधिकारी (डीआयओ) प्रवीण टाके, अनिल गाडेकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.