Published On : Thu, Feb 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

मराठा आरक्षणाविरोधातील ओबीसी संघटनेची याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारली,तातडीच्या सुनावणीला नकार !

Advertisement

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश मिळाले आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत लवकरच त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. मात्र आता राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे.

मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनेकडून मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. याबाबत ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशनचे ॲड. मंगेश ससाणे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली असून तातडीच्या सुनावणीला नकार दिला आहे. यासंदर्भात ओबीसी संघटनेकडून मुंबई हायकोर्टात तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र कुणबी दाखले २०२२ पासून दाखले दिले जात आहेत. मग तातडीच्या सुनावणीची गरज काय? असा सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाने याबाबत पुढील आठवड्यात सुनावणीसंदर्भात तारीख निश्चित करण्यात येईल, असे म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges