नागपूर : नागपूरातील शुभम नगर पालकर ले आऊट परिसरातील बॅाम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली. धनीराम नाईक यांच्या घरी शुजच्या डब्ब्यात बॅाम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. य. त्यानंतर पोलीसांनी संपूर्ण परिसरात खाली करुन, बॅाम्ब स्कॅाडच्या मदतीने बॅाम्ब सदृश्य वस्तू इतर ठिकाणी हलविली.
नागपूर टुडेशी बोलताना डीसीपी, झोन ०१ चे लोहित मतानी यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. बॉम्ब हा असली आहे की नकली आहे, यादिशेने तपास सुरु आहे. निर्जनस्थळी ही बॉम्ब सदृश्य वस्तू नष्ट करण्याकरीत आणल्याची माहिती समोर आली आहे, असे मतानी यांनी सांगितले.
Published On :
Wed, Oct 23rd, 2024
By Nagpur Today
नागपुरातील वाडी परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ; पोलीस घटनास्थळी दाखल
Advertisement