Advertisement
नागपूर: नागपूर भंडारा मार्गावरील कापसी येथे १२ फूट खोल खड्ड्यात एका तरुणाचा मृतदेह त्याच्या दुचाकीसह पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचा मृतदेह ए. जे. जोगिंदर सिंग ढाब्यात गाडलेला होता.
पंकज गिरमकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो हल्दीराम कंपनीत टेक्निशिअन म्हणून कार्यरत होता. गेल्या एक महिन्यापासून पंकज हा बेपत्ता होता. पंकजच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये ढाबा मालकाचा समावेश आहे. अनैतिक संबंधातून पंकजची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अधिक तपास सुरू आहे.