Published On : Tue, Apr 24th, 2018

नियमबाह्य पर्ससीन सामुग्री असलेल्या नौका वरसोली बंदरात जप्त

मुंबई: पर्ससीन सामुग्री नियमबाह्यरित्या बसविण्यात आलेल्या 4 नौकांवर वरसोली बंदर ता. अलिबाग येथे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या नौकेवरील पर्ससीन जाळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण 235 पितळी रिंग ताब्यात घेऊन स्थानिक नाखवा संघ वरसोली यांच्याकडे सुरक्षिततेच्या कारणास्तव सुपूर्द करण्यात आल्या.

पकडण्यात आलेल्या नौका वरसोली बंदरात स्थानबद्ध करून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच नौका मालकाविरुद्ध खटले दाखल करण्यात येत आहेत. ही कारवाई मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. नाखवा, परवाना अधिकारी श्री. पाटील, पोलीस दामिनी पथकातील श्रीमती कांबळे व श्रीमती पवार यांच्या पथकाने केली.