Published On : Fri, Feb 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी…; शरद पवार गटाला पक्षचिन्ह मिळताच जितेंद्र आव्हाडांचे विधान

Advertisement

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर पक्षचिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती देण्यात आली. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिले आहे. एका योद्ध्याला शोभेल असंच हे पक्षचिन्ह आहे. ८४ वर्षांचा म्हातारा, होय मी त्यांना असंच म्हणतो. कारण ८६ वर्षांचा म्हातारा युद्धाला उभा राहिला आहे आणि संकेत काय मिळाले आहेत? तर तुतारी. वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. तुतारी वाजली आहे, युद्धासाठी आम्ही आता तयार आहोत. शरद पवार युद्धाला उभे आहेत.

महाराष्ट्रातल्या राजकीय भूमीतले भीष्माचार्य म्हणजे शरद पवार त्यांच्यासह आम्ही ही लढाई लढण्यासाठी तयार आहोत. लडेंगे और जितेंगे.. परत एकदा सांगतो.. वाजवा तुतारी. असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.