नागपूर : शहरातील कळमना परिसरात जुन्या वैरातून एका २७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांजरा परिसरातील मदनी चौक येथे घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतक रोशन धर्मसिंग उईके हा गुरुवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत चौकात बसलेला असताना आरोपी जावेद उर्फ शकील अन्सारी आपल्या साथीदारांसह तेथे पोहोचला. जुन्या वादातून पेटलेल्या रागातून त्यांनी रोशनवर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रोशनला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी रोशन आणि जावेद यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये वैर कायम होते. तीन दिवसांपूर्वी रोशनने जावेदला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचाच बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.
घटनेनंतर कळमना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी जावेदला अटक केली. सहवाज खान, सलमान आणि सुलतान हे आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, जावेदवर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कळमना पोलीस करत आहेत.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





