Published On : Sat, Sep 30th, 2017

रा.से.यो.तर्फे रक्त तपासणी शिबिर संपन्न.

कन्हान: स्व.संजय चहांदे कला व प्रमोद चहांदे वाणिज्य महाविद्यालय कन्हान येथे राष्ट्रीय सेवा योजने व्दारे भारतीय आदीम जाती सेवक संघ नागपूर यांच्या सौजन्याने महाविद्यालय परीसरात रक्त तपासणी शिबिर रा.से.यो .विभागीय समन्वयक प्रा पराग सपाटे यांचा नेतृत्वाखाली घेण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद चहांदे , प्रकल्प प्रबंधक अजय सींग , प्रयोगशाला तंत्रज्ञ निखिल पाटील , क्षेत्रीय कार्यकर्ते बबलू गिर्ह , प्रियंका येरणे, अरविंद गजभिये, आदी प्रमुखांने उपस्थित होते .या प्रसंगी ६५ रा.से.यो .स्वयंसेवकाची एच .आय .व्ही. सबंधीत रक्त तपासणी करण्यात आली.

या रक्त तपासणी शिबिराच्या यशस्वीते करीता प्रा.मंगेश नितनवरे , प्रा. स्वाती गोंडाणे ,वैष्णवी टाकळखेळे , कोमल चौधरी , दिलीप मरसकोल्हे , शुभांगी सॅलड , धीरज हारोडे , अंगद पात्रे , जय पाहुणे , आदी नी अथक परिश्रम घेतले .