Published On : Tue, May 4th, 2021

रा.स्व.सं.-जिव्हाळातर्फे रक्तदान आणि प्लाझमा दान

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रेशिमबाग नगर) व जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने सिरसपेठ येथील संत गुलाबबाबा सेवाश्रम येथे रक्तदान आणि प्लाझमा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ४२ लोकांनी रक्तदान तर आठ व्यक्तींनी प्लाझमा दान केले.

आता १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणानंतर काही काळ रक्तदान करता येत नाही. त्यामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन जिव्हाळा फाऊंडेशनने ५०० जणांच्या रक्तदानाचे उद्दिष्ट ठेवून पहिले शिबिर नुकतेच आयोजित केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार प्रवीण दटके, रेशीमबाग भाग संघचालक अशोक भुजवणे, संघप्रचारक अभिषेक मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांच्या हस्ते रक्तदाते तसेच आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला. जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष मेश्राम, पराग पाचपोर, डॉ.श्रीरंग वरागपांडे, समीर भोयर, वैभव येवले, विलास मसरे, डॉ.सुमित पैडलवार, अंगद जरुळकर, दिनेश मंदावर, जयेश बिहारे, अक्षय ठाकरे, कुमार बांते, शुभम क्षिरसागर, आकाश काठले, तुषार वघाये, अभिजित सरोदे, वैभव भाडके, उदय आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रसाद कावळे यांच्या टॅगकलेक्टिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे जिव्हाळा फाउंडेशनच्या माध्यमातून १० सॅनिटाईजर मशीन मेडिकलला देण्यात आल्या.

Advertisement
Advertisement