Published On : Wed, Feb 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात क्रिकेट सामन्याच्या तिकीटांचा काळाबाजार उघड; सोशल मीडियावर विक्री करणाऱ्या आरोपींना बेड्या !

सायबर पोलिसांची कारवाई

नागपूर: नागपूरमध्ये भारत-इंग्लंड क्रिकेट मॅचच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सायबर पोलसांनी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला. यादरम्यान पोलिसांनी सोशल मीडियावर Nagpur wow या instagram प्रोफाईलवरून तिकीट उपलब्ध असल्याची पोस्ट टाकणाऱ्या दोन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अजहर सलीम शेख (रा. 706, विदर्भ कॉम्प्लेक्स, संगम टॉकीज चौक, सक्करदरा) आणि त्याचा सहाकारी मित्र रोहीत गोपाल झोडे (वय 24 , सक्करदरा) अशी आरोपींची नावे आहेत.

६ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्याच्या तिकिटांच्या काळ्या बाजाराबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर आज ५ फेब्रुवारीला नागपूर पोलिसांनी Nagpur wow ही इंस्टाग्राम प्रोफाईल हॅन्डल करणाऱ्या दोघांना अटक घेतले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काळ्या बाजाराच्या कारवाया शोधण्यासाठी शहर पोलिसांनी सायबर पाळत ठेवण्याची मोहीम सुरू केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर, सायबर पोलिस स्टेशनच्या सोशल मीडिया सेलने अनधिकृत तिकिट विक्रीत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्स ॲप, ट्विटर आणि एआय-आधारित ट्रॅकिंग टूल्ससह विविध प्लॅटफॉर्मवर बारकाईने लक्ष ठेवले.

Gold Rate
Wednesday12 Feb. 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

५ फेब्रुवारी रोजी, पोलिसांना ‘नागपूर_वॉव’ या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक संशयास्पद पोस्ट आढळली. ज्यामध्ये सामन्याच्या तिकिटांची जादा किमतीत विक्रीची जाहिरात केली जात होती:

-८,००० तिकिटे १२,००० रुपयांना विकली जात होतो (३ तिकिटे उपलब्ध)
– ५,००० तिकिटे १०,००० रुपयांना विकली जात आहेत (२ तिकिटे उपलब्ध)
– ३,००० तिकिटे ७,००० रुपयांना विकली जात आहेत (३ तिकिटे उपलब्ध)

पोस्टमध्ये एक संपर्क क्रमांक (८९९९१२३८८७) देखील नमूद करण्यात आला होता. नंबर ट्रेस केल्यानंतर, पोलिसांनी मालकाची ओळख अजहर सलीम शेख अशी केली, जो विदर्भ कॉम्प्लेक्स, सक्करदरा, नागपूर येथील रहिवासी आहे. त्यानंतर या तिकिटांच्या काळाबाजाराचा भांडाफोड झाला. एकंदरीत ३४,००० रुपयांच्या तिकिटांसह दोघांना अटक करण्यात आली.

Oplus_131072

दुसऱ्या एका कारवाईत सोमवारी सदर पोलिसांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) अधिकाऱ्यांची बनावट ओळख निर्माण करून आणि बेकायदेशीरपणे जादा किमतीत तिकिटे विकल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक केली. आरोपींची ओळख पटली आहे ती मनोहर हेमदास वंजारी (६२) आणि दत्तवाडी येथील राहुल भाऊदास रामटेके (३८) अशी आहे.

दरम्यान आम्ही सोशल मीडियावर सामन्याच्या तिकिटांबद्दल संशयास्पद पोस्ट पसरवणाऱ्या व्यक्तींचे आयपी पत्ते शोधले आहेत. समन्स बजावण्यात आले आहेत आणि त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहावे लागेल, अशी माहिती पोलिस उपायुक्त (झोन १ आणि सायबर) लोहित मतानी यांनी केली आहे.

Advertisement