Published On : Thu, Sep 29th, 2022
By Nagpur Today Nagpur News

साम्बो स्पर्धेत बीकेसीपी चे आरोही व सिध्दार्थ फुलझेले या बहिण,भावाला सुवर्ण व रौप्य पदक

Advertisement

जिल्ह्यातील दहा खेळाडुं पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक.

कन्हान : – नुकत्याच राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा पुणे येथील लोणी काळभोर येथे पार पडल्या. यात नागपुर जिल्ह्यातील १० खेळाडुंची निवड झाली होती. त्या पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक पटकविले. यामध्ये बीकेसीपी स्कुल कन्हान च्या क्रिडा शिक्षक अमित ठाकुर हयानी स्वर्ण पदक तर विद्यार्थी खेडाळु कु आरोही व सिध्दार्थ फुलझेले या कन्हान च्या बहिण,भावाने सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त करून शाळेचे, कन्हान शहरचे व नागपुर जिल्हयाचे नाव लौकिक केले.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्पोर्ट साम्बो असोसिएशन महाराष्ट्र व्दारे दुसरी राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा (दि.२३ व २४ सप्टेंबर २० २२ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकंदरीत संपुर्ण महाराष्ट्रातुन ३०० ते ३५० खेळाडुंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांची जम्मु आणि काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा पुणे येथील लोणी काळभोर येथे पार पडल्या. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी भारताचे सेंबो इंडिया असो सिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भागीरथ लाल व सेक्रेटरी मिस अरोरा या प्रामुख्याने उपस्थित होत्या. नागपुर जिल्ह्यातील दहा खेळाडुंची या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यापैकी पाच खेळाडुंनी सुवर्णपदक व दोन खेळाडुंनी रजत पदक प्राप्त केले आहे.

यात कु. आरोही फुलझेले, सिद्धार्थ फुलझेले, शरद मस्के,भुमेश चौरे, अमित राजेंद्र ठाकुर, क्षितिज रूपचंद सिरीया, हर्षल हुकुमचंद बडेल हयानी विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे कन्हान चे ४ व कामठी चे ३ असे सात खेडाळुनी नागपुर जिल्ह्यासाठी राज्य स्पर्धेत पदक पटकाविले. बीकेसीपी स्कुल कन्हान चे क्रिडा शिक्षक अमित ठाकुर सर यानी स्वर्ण पदक तर इयत्ता १० वी ची विद्यार्थींनी कु.आरोही योगेश्वर फुलझेले व इयता ६ वी चा विद्यार्थी सिद्धार्थ योगेश्वर फुलझेले या बहिण, भावाने सुवर्ण व रौप्य पदक पटकावित नागपुर जिल्ह याचे नाव लौकिक करित स्वत:ला गौरन्वित केले. हे दोन्ही खेळाडु बीकेसीपी स्कुल कन्हान शाळेचे क्रिडा शिक्षक अमित राजेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनात सराव करित असल्याने या विजेत्या खेळाडुंचे संस्था संचाल क श्री राजीव खंडेलवाल, संस्था सचिव पुष्पा गेरोला व शाळेच्या मुख्याध्यापिचका कविता नाथ हयांनी मन पुर्वक स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करित शुभेच्छा दिल्या.

पुढच्या वाटचालीसाठी व राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पोर्ट साम्बो असोसिएशन महाराष्ट्रा चे सचिव शंकरकुमार उगाडे आणि नागपुर जिल्हा साम्बो असोसिएशन व्दारे खेळाडुंना शुभेच्छा देण्यात आल्या असुन कन्हान परि सरातुन अभिनंदना चा वर्षाव करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement