भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम मंडळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्राची युवा मोर्चाची कार्यकारणीची घोषणा ग्रीन व्हॅली लॉन, राजीव नगर येथे जाहीर करण्यात आली.
यात अध्यक्ष पदी नागेश विजय साठवणे, महामंत्री आशुतोष भगत, अमन पौनीकार, यश भगत, शौनक जहागिरदार यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी प्रामुख्याने भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजप दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष रितेश गावंडे, निवडणूक प्रमुख किशोर वानखेडे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पारेंद्र ( विक्की ) पटले, देवा डेहनकर, भाजप नागपुर महानगर महामंत्री संदीप गवई, संपर्क प्रमुख रमेश भंडारी, माजी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, भाजयुमो शहर अध्यक्ष बादल राऊत, यश शर्मा, पुष्कर पोषेट्टीवार तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकारणीतील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये संपर्क प्रमुख पदी यश चौधरी, प्रसिध्दी प्रमुख पदी तेजस जोशी, सह-संपर्क प्रमुख पदी साकेत मिश्रा, प्रफुल आंबुलकर, चिन्मय गोरंटिवार, सह-प्रसिध्दी प्रमुख पदी सागर हिवरकर, कोषाध्यक्ष पदी अमित गुप्ता, कार्यालय प्रमुख पदी अनिकेत पंडित, सोशल मीडिया संयोजाक पदी श्रेयांश शाहु, युथ वॉरियर संयोजाक पदी श्रीवर्धन पोलारकार, युथ वॉरियर सह-संयोजाक पदी अनिकेत सोंडवले, आयटी प्रमुख आदित्य बनकर यांच्यासह २३ उपाध्यक्ष, २४ मंत्री यावेळी घोषित करण्यात आले.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी प्रमुख नेत्यांचे आभार मानले.