– स्थायी समिती सभापतीपदी संदीप आवारी यांची अविरोध निवड,महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पा उराडे आणि उपसभापतीपदी शितल कुळमेथे

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संदीप आवारी यांची अविरोध निवड झाली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनपात बॅण्डपथकासह जल्लोष करीत विजयी मिरवणूक काढली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात ११ ऑक्टोबर रोजी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समिती सभापती व महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रक्रिया सुरू झाली.
यावेळी भारतीय जनता पक्षाकडून संदीप आवारी यांनी नामांकन दाखल केले होते. एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी संदीप आवारी यांची अविरोध निवड जाहीर केली. त्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पा उराडे आणि उपसभापतीपदी शितल मारोती कुळमेथे यांची अविरोध निवड झाली.
दरम्यान, नवनियुक्त तिन्ही पदाधिकाऱ्यांचे महापौर कक्षात स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मावळते स्थायी समिती सभापती रवि आसवानी, प्रकाश धारणे, गटनेत्या जयश्री जुमडे यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





