Published On : Mon, Mar 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपाची खेळी;लोकांना पाठविले जातात व्हॉट्सॲप मेसेज,काँग्रेस पक्षाकडून संताप व्यक्त !

Advertisement

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.यानंतर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. मोदी सरकारकडून व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला आहे. भाजप सरकार ‘विकासित भारत संपर्क’ नावाच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून लोकांच्या मोबाईलवर हा मेसेज पाठवून फीडबॅक मागवत आहे. मात्र आता, या मेसेजवरून राजकीय वाद निर्माण झाला.

निवडणुका जाहीर झाल्यानंतरही भाजप आपल्या प्रचारासाठी ही खेळी खेळत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केले. सरकारकडून पाठवण्यात येत असलेल्या या मेसेसोबत पंतप्रधान मोदींचे एक पत्रही आहे. सरकारच्या डेटाबेसचा वापर करून राजकीय प्रचार केला जात असल्याचे काँग्रेसने म्हणणे आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेसच्या केरळ युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हॉट्सॲपची मूळ कंपनी असलेल्या मेटाला टॅग करत म्हटले आहे की, विकसित भारत संपर्क नावाच्या व्हेरिफाइड बिझनेस अकाउंटवरून लोकांना मेसेज पाठवला जात आहेत. या मेसेजमध्ये लोकांकडून फिडबॅक मागवला जात आहे. यासोबत जोडलेले पीएम मोदींचे पत्र राजकीय प्रचाराशिवाय दुसरे काही नाही. या माध्यमातून पंतप्रधान मोदी आपल्या पक्षाचा प्रचार करत असून सरकारी डेटाबेसचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲपचाही राजकारणासाठी गैरवापर होत आहे.

केरळ काँग्रेसने सरकारच्या पॉलिसीचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यात, कंपनी कुठलाही राजकीय पक्ष, राजकारणी, राजकीय उमेदवार अथवा राजकीय प्रचारासाठी मेसेजिंग ॲप वापरण्यास कंपनीची मनाई आहे, असे म्हणण्यात आले आहे. यावर, ही कंपनीची पॉलिसी असेल तर, एका राजकीय नेत्याला प्रचारासाठी हा प्लॅटफॉर्म का देण्यात आला? की भाजपसाठी आपले काही वेगळे धोरण आहे? असा संतप्त सवालही काँग्रसने उपस्थित केला.

सरकारने या मॅसेजच्या माध्यमातून नागरिकांना प्रतिक्रिया मागवल्या आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमची साथ आणि तुमच्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे या योजनांसंदर्भात आपले मत नोंदवावे ही विनंती, असे या मेसेजमध्ये म्हणण्यात आले आहे.

Advertisement