Published On : Sat, Apr 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपचे एकच स्वप्न ते म्हणजे शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा टोला

Advertisement

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला. शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे षडयंत्र भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचे नेते एकवटले आहेत. आम्ही मात्र सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू,असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.सुळे या हिंजवडीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Gold Rate
Monday 20 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 91,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्राचे लढवय्ये नेते शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवायचे हे भाजप नेत्यांच्या तोंडून महाराष्ट्रासह अवघ्या देशांने ऐकलं आहे.

बारामतीमध्ये येऊन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना संपवायचं, अशी भाषा वापरली, हे भाजपच्या पोटातील ओठावर आले आहे. हे भाजप नेत्यांचे आणि चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

Advertisement