| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, May 21st, 2020

  भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन हे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठीची खटाटोप

  शिवसेना प्रवक्ते किशोर कन्हेरे यांची प्रतिक्रिया

  नागपुर: महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाने राज्यात कोरोनाचे भीषण संकट सुरु असतांना महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे. हे आंदोलन म्हणजे निव्वळ राज्यातील जनतेची दिशाभुल करण्याची खटाटोप असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे. शिवसेना प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी भाजपचे हे आंदोलन केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणले आहे.

  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती सक्षम पणे हाताळली असून लॉकडाऊनच्या या कालावधी मध्ये राज्य सरकारने गरीब,मजदूर,शेतकरी,सामान्य कष्टकरी आणि राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय केले असून मजुरांना ट्रेन च्या माध्यमातून त्यांच्या गावी पाठविणे असो वा परिवहन मंत्री अनिल परब यांच्या परिवहन विभागामार्फत राज्यातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्यांसाठी लाल परी चालविण्याचा निर्णय असो , कोरोनाच्या या संकट काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार चांगले कार्य करत असून उगाच असले काही तरी स्टंट करून राज्यातील नागरिकांमध्ये सरकार बाबत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करत आहे .

  राज्यातील जनता सुजाण असून भाजपच्या अश्या दिशाभूल करणाऱ्या आंदोलनाला बळी पडणार नाही अशे शिवसेना प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे .

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145