Published On : Mon, May 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; नवी पहाटहोणार सत्तांतराची!

Advertisement

कोलकाता -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) ने अभूतपूर्व कामगिरी करत स्पष्ट बहुमत मिळवले असून राज्यात सत्तांतर निश्चित झाले आहे. 294 पैकी बहुमताचा 148 चा टप्पा सहज ओलांडत भाजपने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे.

मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात भाजपने 190 हून अधिक जागांवर आघाडी घेतली, तर तृणमूल काँग्रेस ला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडल्याचे चित्र दिसत आहे.

या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. भवानीपूरसह अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.

दुसरीकडे भाजपने ग्रामीण तसेच शहरी भागात भक्कम घुसखोरी करत आपली ताकद सिद्ध केली. सुवेंदु अधिकारी आणि इतर नेत्यांच्या रणनीतीमुळे पक्षाला मोठा फायदा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Advertisement

दरम्यान, आसाम मध्येही भाजपने आघाडी कायम राखत पुन्हा सत्तेकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवल्याचे संकेत मिळत आहेत.एकूणच, या निवडणुकीत भाजपने मोठा राजकीय विजय मिळवत देशाच्या राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.