Published On : Sat, Apr 6th, 2024

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्ता ताब्यात; संशयित आरोपीशी संबंध असल्याचा संशय

Advertisement

बंगळुरू:कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये १ मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला होता.याप्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहे. या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू होता.

सुरुवातीला या प्रकरणात ‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’शी (पीएफआय) संबंधित एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एनआयएने साई प्रसाद नावाच्या भाजपा कार्यकर्त्याला अटक केली आहे, अशी बातमी समोर येत आहे.

या घटनेदरम्यान आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला होता. या स्फोटामध्ये १० लोक जखमी झाले होते.

साई प्रसादला आता चौकशीसाठी एनआयएने ताब्यात घेतले आहे. या स्फोटाशी संबंधित दोन संशयितांचा आणि त्याचा काही संबंध आहे का? याबद्दल चौकशी केली जात आहे. मागच्या आठवड्यात एनआयएने शिवमोग्गा जिल्ह्यात काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये आरोपीचे मोबाइल दुकान आणि इतर दोन संशयितांच्या घरावर छापेमारी केली होती.