Published On : Fri, May 25th, 2018

लाखनी नगर पंचायत भाजपाने काँग्रेसकडून खेचली नगर पंचायत निवडणूक

Advertisement


नागपुर/भंडारा: लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच लाखनी नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने नगर पंचायत काँग्रेसकडून आपल्याकडे खेचून विजय प्राप्त केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विजयाबद्दल अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन करून स्वागत केले.

भाजपाचे अध्यक्ष ज्योती निखाडे या अध्यक्ष पदासाठी निवडून आल्या तर माया निंबेकर या उपाध्यक्ष पदासाठी निवडल्या गेल्या. एकूण 17 सदस्यांची ही नगर पंचायत आहे. अध्यक्ष ज्योती निखाडे व उपाध्यक्ष माया निंबेकर यांना प्रत्येकी 9 मते पडली. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता या नगर पंचायतीत होती.

या नगर पंचायतीत भाजपाचे 8 सदस्य, काँग्रेसचे 7 सदस्य व राष्ट्रवादीचे 2 सदस्य आहे. राष्ट्रवादीच्या एक सदस्याने भाजपाला मदत केल्यामुळे भाजपा उमेदवाराला प्रत्येकी 9 मते मिळाली. भंडारा गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा उमेदवाराच्या विजयाचे संकेत या निवडणुकीने दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.