Published On : Sat, Mar 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात होणाऱ्या राष्ट्रीय नमो युवा संमेलनातून भाजपला युवा पिढीची साथ लाभणार ; चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

Advertisement

नागपूर : भाजपकडून नागपुरात ४ मार्चला राष्ट्रीय नमो युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे.अमरावती रोडवरील नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दुपारी ३ वाजता या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत. या संमेलनात राज्याच्या वेगवेगळ्या भागातील एक लाख युवा सहभागी होतील, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नमो युवा संमेलनातून भाजपला युवा पिढीची साथ लाभणार असून यामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचेही ते म्हणाले.

या संमेलनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्यासह भाजपचे आमदार- खासदारही या संमेलनात उपस्थित राहणार आहे.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या संमेलनात युवकासांठी संकल्पपत्र तयार करण्यात येणार आहे. यामाध्यमातून त्यांचे मत जाणून घेतले जाईल. तसेच हे मत केंद्र सरकारकडे मांडले जातील. इतकेच नाही तर जाहीरनाम्यातही ते नमूद करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

या संमेलनात १८ ते ३५ वयोगटातील अभियांत्रीकी, वैद्यकीयसह सगळ्याच विद्यापीठ व क्षेत्रातील युवा सहभागी होतील.तसेच या संमेलनात सोशल मीडियातील युवा इन्फ्लुएनसर्सला आमंत्रित करण्यात आले आहे.हे संमेलन २०२४ च्या निवडणुकांसाठी महत्त्वाचे असून यामध्यमातून विकसित भारतात युवकांची भूमिका काय असेल हे देखील स्पष्ट होईल, असे बावनकुळे म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.