यवतमाळ :शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हाल्लाबोल केला.भाजपला महाराष्ट्रात कठपुतलीच्या तालावर नाचणारे सरकार हवे होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ठाकरे यांनी या सभेच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला. दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा दरोडा टाकून स्वत:ची संपत्ती दाखविण्याचा प्रयत्न फडणवीस करीत असल्याचे ते म्हणाले.
तसेच ते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’चा नारा देत महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडून पुन्हा सत्तेत आले, असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात जनसंवाद सभा घेत आहे. उमरखेड येथे त्यांनी सभा झाली. सभेला मोठी गर्दी जमली होती. व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते संजय राऊत , माजीमंत्री संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, पोहरा (देवी) चे महंत सुनील महाराज आदी प्रामुख्याने उपस्थित होते.