Published On : Mon, Mar 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

भाजपचा बावनकुळे यांच्यावर विश्वास;ओडिशा निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी

Advertisement

ओडिशा : येत्या १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ओडिशा राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ही जबाबदारी सोपवण्यात आली असून निवडणुकीतील पक्षाचे नियोजन आणि संपूर्ण प्रक्रिया यावर लक्ष ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी बावनकुळे यांच्याकडे असणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका प्रभावीपणे राबवण्यासाठी अनुभवी नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

या नियुक्तीनंतर बावनकुळे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करू, असे त्यांनी सांगितले. संघटनात्मक शिस्त पाळत आणि पक्षाच्या मार्गदर्शनानुसार ही जबाबदारी पार पाडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, केवळ ओडिशाच नव्हे तर इतर राज्यांतील राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही भाजपकडून केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार राज्यासाठी विजय शर्मा आणि हर्ष मल्होत्रा यांना निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

तसेच हरियाणा राज्यासाठी हर्ष सांगवी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये अनुभवी नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवून भाजपने संघटनात्मक तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या नियुक्त्यांमुळे निवडणूक प्रक्रियेत पक्ष अधिक सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.