Published On : Thu, Jan 18th, 2018

भाजप प्रवक्त्या साजिया इलमी यांनी केली विकास प्रकल्पांची प्रशंसा

Advertisement

नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या साजिया इलमी यांनी गुरुवारी (ता. १८) नागपूर महानगरपालिकेला भेट देऊन मनपा अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. या प्रकल्पांनी प्रभावित झालेल्या साजिया इलमी यांनी या प्रकल्पांची प्रशंसा केली.

नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित बैठकीत प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी श्रीमती साजिया इलमी यांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप व शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ग्रंथ देऊन स्वागत केले. बैठकीला नगरसेवक विक्की कुकरेजा, नगरसेविका दिव्या धुरडे, सोनाली कडू, अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दिकी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, मनोज तालेवार, संजय गायकवाड, परिवहन व्यवस्थापक जी. एम. जगताप, उपअभियंता राजेश दुफारे उपस्थित होते.

यावेळी प्रवक्त्या साजिया इलमी यांच्यासमोर ग्रीन बस, नागपूर ऑरेंज स्ट्रीट सिटी, नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, सांडपाणी प्रक्रिया, पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्प (एसटीपी) आदींविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. हे सर्व प्रकल्प पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने हितकारक असल्याचे मत श्रीमती साजिया इलमी यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पांविषयी माहिती दिली होती. परंतु आज प्रत्यक्ष येथे सुरू असलेले कार्य पाहून प्रभावित झाल्याचे त्या म्हणाल्या.

Advertisement

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.