Published On : Fri, Jun 11th, 2021

पालकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भाजयुमो दक्षिण नागपुरतर्फे आंदोलन..!

Advertisement

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वर्षभराहूनही अधिक काळापासून सारे जनजीवन विस्कळीत झालेले आहे़ अनेकांचे रोजगार ठप्प झाले त्यामुळे दैनंदिन गरजा पुर्ण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही जड झाले़ कोरोनामुळे जीवनाची घडीच विस्कटली असतांना शैक्षणिक सत्रांवरही त्याचा मोठा परिणाम झाला़ यामुळे विद्यार्थी मागील सत्रांपासून घरीच आहेत़ शिवाय आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळांनी थातुरमातूर शिक्षण पुरविले़ अशातच ज्यांची आर्थिक परिस्थीती बेताची होती अशांनाही मुलांच्या आँनलाईन शिक्षणासाठी अत्याधुनिक मोबाईल घ्यावा लागला तर त्याचे मासिक व्यवस्थापनही वाढले़ अनेक शाळांनी पालकांना दिलासा न देता अगोदर प्रवेश फि च्या नावाखाली रक्कम घेतलीच शिवाय मासिक फी सुद्धा पालकांकडून घेण्यात आली, याशिवाय ज्या पालकांनी परिस्थीती अभावी रक्कम दिली नाही त्यांना विविध कारणांनी मानसिक त्रास देण्यात येत आहे़

शाळा पुर्णपणे बंद असल्यामुळे शाळांचा व्यवस्थापन खर्च ज्यात इलेक्ट्रिक खर्च, स्वच्छता खर्च, वाहतुक खर्च याशिवाय अनेक शाळांनी आपल्या शिक्षकांना अर्धाच पगार दिला़ त्यामुळे काही प्रमाणात पालकांना दिलासा देणे हितकारक होते़ मात्र वर्षभरापासून हिरावलेला रोजगार व त्यात शाळा व्यवस्थापनांच्या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे़

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अशाच शाळांच्या विरोधात दक्षिण नागपुर भारतीय जनता युवा मोर्चा पालकांवर होत असलेल्या आर्थिक भुर्दंडाविरोधात तीव्र आंदोलन दक्षिण नागपूर भाजयुमो अध्यक्ष अमर धरमारे तसेच पदाधिकाºयांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौक, मानेवाडा येथे करण्यात आले़ राज्य शासनाने पालकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी विनंती अमर धरमारे यांनी राज्य शासनाला केली़

अन्यथा प्रत्येक शाळेसमोर भाजयुमोच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला़ काही दिवसांपुर्वीच अशाच एका घटनेत दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वात नंदनवन येथील स्वामी अवधेशानंद शाळेत पालकांना होत असलेल्या तक्रारींबाबत आंदोलन करण्यात आले आहे़ त्यानंतर शाळा प्रशासनानेही सकारात्मक पवित्रा घेतलेला होता़ या आंदोलनावेळी हा आंदोलन दक्षिण नागापूर लोकप्रिय आमदार मोहन जी मते यांच्या मार्गदर्शनात व दक्षिण नागपूर चे युवा मोर्चा अध्यक्ष श्री अमर जी धरमारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले व मंडळाचे महामंत्री अमित बारई, आकाश भेदे, वैभव चौधरी, नितीन सिमले, अनुप सिंघ, मोहित भिवनकर, केतन साठवने, रिद्धु चोले, संकेत कुकडे, सुरज कावरे, आशीष मोहिते, अभिजीत गावंडे, सैम मते, स्वरूप कोंडमलवार, ओम भांडे, प्रसाद हडप, अभिनव जिकार, विजय मोघे, साहिल शरणागत, मोहित घाईवट, विजय येवले, राम गौळकर, सैम लुतडे, रीतीक आसोले, यांच्यासह दक्षिण नागपुरचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement